। पनवेल । प्रतिनिधी ।
आजोबांना चहा देऊन येतो असे सांगून 61 वर्षीय एक इसम राहत्या घरातून निघून गेले असून अद्याप परतलेले नाही. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात ते हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अजीज ईब्राहीम तांबोळी (वय 61, मरियम अपार्टमेंट, रूम नंबर 301, पनवेल) अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 3 इंच, चेहरा-उभट, रंग-सावळा, डोक्याला पुढील बाजुस अर्धवट टक्कल पडलेले, डोळे काळे, नाक-सरळ, दाढी मिशीचे केस काळे पांढरे, अंगात नेसुन-गुलाबी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट तसेच, हिंदी, मराठी भाषा बोलणारे आहेत. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोहवा विनय तळभंडारे यांच्याशी संपर्क साधावा.







