पनवेलमध्ये 67 हजारांची घरफोडी

| पनवेल | वार्ताहर |

किचनच्या खिडकीवाटे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने जवळपास 67 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना शहरातील साईनगर परिसरात घडली आहे. या ठिकाणी राहणारे बानु मुमताज अबु शेख, रा.सुर्यकिरण अपार्टमेंट, सार्ईनगर यांच्या राहत्या घराच्या किचनच्या खिडकीवाटे अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मोबाईल फोन व सोन्याची चेन असा मिळून जवळपास 67 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

Exit mobile version