कोकणातील तीन बंदरांना ६७३ कोटींचा निधी

। दाभोळ । प्रतिनिधी ।
खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने रायगड लोकसभा मतदार संघातील तीन बंदरांच्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील साखरी नाटे बंदराच्या विकासासाठी केंद्र सरकारने 673.33 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

तटकरे यांनी हर्णेसह श्रीवर्धन येथील जीवना बंदर व श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील बंदरांचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली. संसदेच्या अधिवेशनात प्रश्‍नही मांडले. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या बंदर विकासासाठी राज्य शासन आपला खर्चाचा वाटा उचलेल असा प्रस्तावही केंद्र शासनाला देण्यात आला होता. श्रीवर्धन तालुक्यातील जीवना व भरडखोल तसेच दापोली येथील हर्णे, राजापूरमधील साखरी नाटे या चार बंदरांचा विकास करण्यासाठी सुमारे 673.33 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्र शासनाच्या पशु, दुग्ध व मत्स्य मंत्रालयाने मान्यता दिली असून तसा आदेश काढण्यात आला आहे.

Exit mobile version