जिल्ह्यात 7 लाख 82 हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 82 हजार 171 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यामुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर होणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत फ्रंट लाईन वर्कर 89 हजार 472, हेल्थ केअर वर्कर 38 हजार 923 जणांनी लस घेतली आहे.

वय वर्षे 18 ते 44 या गटातील 1लाख 87 हजार 768, वय वर्षे 45 ते 60 वर्षांपर्यंतच्या 2 लाख 67 हजार 132 आणि वय वर्षे 60 च्या पुढील वयोगटातील 2 लाख 67 हजार 132 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये चार लाख 55 हजार 298 पुरुष, तीन लाख 26 हजार 778 आणि इतर 95 जणांनी लस घेतली आहे. सहा लाख 31 हजार 710 जणांनी पहिली आणि एक लाख 50 हजार 461 जणांनी दुसरी असे एकूण सात लाख 82 हजार 171 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

Exit mobile version