धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड पोलीस दलास सात लाखांची मदत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रेवदंडा येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरीता बुधवारी (20 जुलै) पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सात लाखांचा धनादेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड दयानंद गावडे, उमेश धर्माधिकारी, डॉ. सचिन र्माधिकारी, राहुल धर्माधिकारी हे उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी या रकमेचा विनियोग रायगड जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटुंबीयाच्या कल्याणासाठी केला जाईल असे सांगत पोलीस दल व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version