48 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना रुग्णांची संख्या रायगड जिल्ह्यात वाढतच असून मंगळवारी दि. 4 जानेवारी रोजी कोरोनाच्या 702 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच दोन तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 521, पनवेल ग्रामीण 68, उरण 2, खालापूर 17, कर्जत 8, पेण 23, अलिबाग 28, माणगाव 10, रोहा 17, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 5 तर पोलादपूर 1 असे 702 रुग्ण आढळले. तसेच मुरुड आणि सुधागड या 2 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 611 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 131 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 590 वर गेला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 890 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.