स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणगावमधून जनावरांची चोरी करुन कत्तल करणार्या पाचजणांच्या टोळीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करीत जेरबंद केले आहे. मंगेश सिताराम शिंदे रा.यलवडे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे येथे आपली गुरांची चोरी झाल्याबाबत आणि त्यांची कत्तल केलेबाबत तकार दिली होती. असेच अशा प्रकारचे गुन्हे तळा, गोरेगाव महाड इत्यादी ठिकाणी घडले होते. त्यानुसार माणगाव पोलीस ठाणे कॉ. गुन्हा रजि. नंबर 212/2021. भा.द.वि. कलम 379,429 सह महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5,9 वगैरे प्रमाणे माणगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 30/09/2021 रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्हयाचे गांर्भीय पाहता पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार वरील गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.अ.शाखा, रायगड पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपींचा शोध लागला नसल्याच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन याचा समांतर तपास चालु होतो. सदर आरोपीत यांचेबाबत स्था.गु. अन्वेषण शाखेकडील पोहवा राजेश पाटील यांना अशा प्रकारचे गुन्हे करणार्या आरोपींबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली त्यानंतर आरोपीत फरहान निसार जिवारी उर्फ बाबा जिवारी (वय 37) रा. दामात, नेरळ ता. कर्जत यास त्याबाबत घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथिदार तौसीफ सुर्वे, सलमान, अमीर मारू यांचे मदतीने माणगाव, गोरेगाव, तळा, महाड या भागात जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केली असल्याचे कबुल केले आहे.
त्यानुसार फरहान निसार जिवारी उर्फ बाबा जिवारी वय-37 रा. दामात, नेरळ ता. कर्जत, तौसीफ सुर्वे रा. कल्याण जि. ठाणे, अमीर मारू रा. कल्याण, सलमान पुर्ण नाव माहीत नाही यांचा सहभाग आहे. त्यांच्याकडून माणगाव पोलीस ठाण्यात दोन, तळा पोलीस ठाणे हद्दीत एक, गोरेगाव पोलीस ठाण, महाड एम आय डी.सी. तसेच तळासरी पोलीस ठाण्यात एक असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, स्था.गु.अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक महेश कदम, पोहवा राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, पोलिस नाईक राकेश म्हात्रे, चालक पोलिस हवालदार देवराम कोरम व सायबर सेल शाखेचे पोलिस नाईक अक्षय पाटील या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली असुन वरील गुन्हयाचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.