अलिबाग तालुक्यात रविवारी कोरोनाचे 71 नवे रुग्ण; 2 मृत्यू

75 रुग्ण कोरोनामुक्त;  अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज रविवार दिनांक 18 जुलै रोजी कोरोनाच्या 71 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 2 रुग्णआंचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर तर 75 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात 17 हजार 830 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 508 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 16 हजार 440 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 882 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version