रायगड जिल्ह्यात 77 रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू तर 120 कोरोनामुक्त, 6 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या 77 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 120 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 6 तालुक्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
 
आज पनवेल महापालिका हद्दीत 40, पनवेल ग्रामीणमध्ये 20, अलिबागमध्ये 4, खालापूरमध्ये 1, उरणमध्ये 2, पेणमध्ये 2, रोह्यात 1, सुधागडमध्ये 1 व पोलादपूरात 1 रुग्णाची नोंद झाली आहे. तर मुरुड, श्रीवर्धन, महाड, म्हसळा, माणगाव, , तळा या 6 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 214 झाली आहे. यापैकी 1 लाख 64 हजार 744 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 372 वर गेला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 098 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version