सरपंचपदाचे ३६ तर सदस्यपदाचे १७५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचयतीसाठी पंचवार्षिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया १८ डिसेंबर रोजी पार पडली. सायंकाळ पर्यत जवळपास ८३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाचे ३६ तर १७५ सदस्यपदाचे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी २० डिसेंबर रोजी मतमोजणीतून उमेदवारांचे नशीब खुळणार असल्याने एक दिवस मतदानाची बेरजा मारण्यात व्यस्त झाले आहेत.
खालापूर तालुक्यात साजागव, देवन्हावे, खरीवली, वावोशी, गोरठण, आपटी, माडप, वावंढळ, टेंभरी, हाळ खुर्द, चावणी होराळे, नडोदे, वडवळ ग्रामपंचायतीत निवडणूक झाली गोरठण ग्रामपंचायत सरपंच पदासह बिनविरोध झाली. इतर ग्रामपंचायतीत काही सदस्य पद बिनविरोध झाले असली तर सर्व जागांसाठी स्थानिक पातळीवर पक्षाशी आघाडी करीत निवडणूकीला सामोरे गेले आहे.
१८ डिसेंबर रोजी पार पडली. सायंकाळ पर्यत जवळपास 83 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाचे ३६ तर १७५ सदस्यपदाचे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी २० डिसेंबर रोजी मतमोजणीतून मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलिस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूरचे पोलिस निरिक्षक बाळा कुंभार, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.