मालमत्ता विभागातील प्रलंबीत 880 प्रकरणे निकाली

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेतील मालमत्ता विभागात मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली शेकडो प्रकरण या विभागाने निकाली काढली असल्याची माहिती पालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली.

पालिकेच्या मालमत्ता विभागाला मागील दोन वर्षांपासून मालमत्ता कर वसुलीचे मोठे टार्गेट आहे. नव्याने लागु करण्यात आलेल्या मालमत्ता करप्रणाली वरून मागील पाच वर्षाचा एकत्रित पूर्वलक्षी प्रभावानुसार कर वसुलीचा हा टार्गेट असल्याने संपूर्ण यंत्रणा कर वसुलीकडे लागली असताना मालमत्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त गणेश शेटे यांनी पुढाकार घेत या विभागातील सुमारे 880 प्रकरणे निकाली काढली आहेत.यामध्ये 400 प्रकरणांचे फेरफार मंजुर केले असून उर्वरित 480 प्रकरानात त्रुटी असल्याची माहिती संबंधितांना दिली आहे.मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली असल्याचे शेटे यांनी सांगितले.

Exit mobile version