। पनवेल । वार्ताहर ।
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसीत केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाईन मालमत्ता उतारा हा आता विनाशुल्क मिळणार आहे. मागील स्थायी समितीमध्ये या विषयास सर्व सदस्यांनी मंजूरी दिली आहे.
ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने, महापालिकेने हा उतारा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मालमत्ताधारकांनी प्रत्यक्ष मालमत्ता विभागातून मालमत्ता उतारा घेतल्यास त्यांना विहीत केलेली प्रती उतारा 100 रुपये फी द्यावी लागणार आहे. तसेच ऑनलाईन उतारा घेण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला संपुर्ण मालमत्ता कर भरणा करणे आवश्यक असून त्यानंतरच वेबसाइटवरून विनाशुल्क उतारा डाऊनलोड करता येणार आहे. मालमत्ता धारकांना ई सुविधा देण्याकरिता तसेच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी, घरबसल्या आपल्या मालमत्ता करासंबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती देण्याच्या हेतुने ‘ मनपा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘झचउ ढ-द -झझ’ मोबाईल प विकसित करण्यात आले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत मालमत्ता करांवरती 5 टक्के सूट देण्यात आली असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.