। म्हसळा । वार्ताहर ।
ओबीसींच्या 4 आरक्षित जागांना स्थगिती मिळाली असता तेथे सर्वसाधारण जागेवर दि.18 जानेवारी रोजी मतदान प्रकिया होणार असून दि.3 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे अंतिम दिवशी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये 4 राष्ट्रवादीचे तर 2 शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर दि.30 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचा दिपल शिर्के हे उमेदवार डमी असल्याने चारही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस सेना युती अशीच थेट लढत पहायला मिळणार आहे.