अलिबाग तालुक्यात गुरूवारी 99 कोरोनाचे रुग्ण

सहाजणांचा मृत्यू; दिवसभरात 56 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग तहसीलदार यांची माहीती

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात आज गुरूवारी 9 जून रोजी कोरोनाच्या 99 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 56 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने सहा रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 364 झाली आहे. यापैकी 416 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 740 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 208 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version