दुकानदाराविरुद्ध तक्रार
| महाड | जुनेद तांबोळी |
महाड शहरातील एसटी स्टँड परिसरामध्ये असलेलं महाबळेश्वर स्वीटमार्टमध्ये बुरशीयुक्त मिठाई सापडल्याने दुकानदार बोराणा विरुद्ध पोलीस ठाणे तसेच अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. बिरवाडी येथील चेतन पवार यांच्या पत्नीने खरेदी केलेल्या मिठाईला बुरसी आढळली.त्यानी ही घटना दुकानदार बोराणा यांच्या निदर्शनास आणली. याबाबतचे फोटो,व्हीडीओ सोशल मिडियावरुन तातडीने व्हायरल झाल्याने शहरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.दुकानदार बोराणा यांनीही ही मिठाई आपल्याच दुकानातून खरेदी केल्याची कबुली दिली. मात्र अद्याप दुकानदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यांचे दुकान रविवारीही सुरु होते.