| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी आता काही तासांचा कालावधी उरला आहे. हे यान उतरताना दोन विक्रमांचीन नोंद करणार आहे. यामध्ये प्रथम, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, भारत हा पराक्रम करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश बनेल.
दुसरा विक्रम म्हणजे चांद्रयान-3 चंद्रावर अशोकस्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह बनवेल. आता लँडरची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि लँडिंग साइटवर सूर्योदय होईपर्यंत प्रतीक्षा करेल. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:45 वाजता, लँडरला सर्वात कमी अंतरावर म्हणजेच 25 किमी उंचीवरून सॉफ्ट लँड करण्याचा प्रयत्न केला जाईल.असे इस्त्रोने नमूद केलेले आहे.