| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-वावे रस्त्यावरील कावीर येथे वळणावर सोमवारी रात्री दोन दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले असून दोघेजण अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामध्ये दुचाकी वाहनांचेदेखील नुकसान झाले.
अलिबाग-रोहा मार्गावरून दोन दुचाकी जात होत्या. त्यातील एक दुचाकी वावेकडून अलिबागकडे व दुसरी दुचाकी अलिबागकडून वावेकडे जात होती. दरम्यान, कावीर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आल्यावर या दोन्ही वाहनांची वळणावर समोरासमोर धडक झाली.
या अपघातामध्ये तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. यातील दोघांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयात दोघेही उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे.