पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
। सांगली । प्रतिनिधी ।
सांगली जिल्ह्यातील बँगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना शनिवारी (दि.21) घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ हे कुटुंब आपल्या गावकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कारवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (46), पत्नी धोराबाई (40), मुलगा गण (16), मुलगी दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (35) यांचे देखील निधन झाले आहे. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 3 महिन्यांपूर्वीच घेतलेल्या कारमध्ये इग्गाप्पागोळ यांनी कार खरेदी केली. केए 01 एनडी 1536 व्होल्वो कारने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे चंद्रम यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी व्होल्वो कार खरेदी केली होती.