| पनवेल | वार्ताहर |
वाहनचालकांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे समजावून रक्षाबंधन सण क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे सातवे वर्ष असून, अध्यक्षा रुपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वाहनचालकांना सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सांगून रक्षाबंधन साजरी करण्यात आला.