| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर-16 मधील सिडकोच्या एमबीआर वॉटर प्लांटच्या जागेवर ठेवण्यात आलेला विजेच्या साहित्याचा कंटेनर फोडून त्यातील तब्बल 13 लाख 50 हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील दोघांना सिडकोच्या सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीतील इतर पाच साथीदार कंटेनरमधील विजेचे साहित्य टेम्पोतून घेऊन पळून गेले आहेत. मोहम्मद हसन जावेद शेख (28) व विनोद भगवान लोखंडे (30) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.