| पनवेल | वार्ताहर |
मुंबई-पुणे महामार्गावरून खारघर येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.कालूलाल मोहनलाल दाभई (48) असे मृताचे नाव आहे. तो मुंबई पुणे महामार्गावरील आरबीआय कॉलनी मेट्रो स्टेशन व बेलपाडा मेट्रो स्टेशनमध्ये पीडब्ल्यूडी हेल्पलाइन बोर्ड जवळून रस्ता ओलांडत होता.