| अलिबाग | वार्ताहर |
माजी राज्यमंत्री तसेच जिल्ह्याच्या रणरागिणी मिनाक्षी पाटील यांना वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे मंचाचे अध्यक्ष सखाराम आण्णा पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, श्रीरंग घरत, चारुशीला कोरडे, जेष्ठ साहित्यिक शरद कोरडे, नाट्यकर्मी जगदीश नागे, कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, राजाराम भगत, अँड. राजेंद्र जैन, हेमकांत सोनार आदींच्या उपस्थितीत त्यांना मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.