10-2 अशा फरकाने केला पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 10-2 अशा गोल फरकाने विजय मिळवत पराभवाची धूळ चारली. इतक्या मोठ्या फरकानं भारताचा विजय झाल्यानं भारतीय हॉकीविश्वातला ऐतिहासिक विजय मानला जात आहे. सामना सुरु झाल्यानंतर भारतानं पहिल्या सत्रामध्ये चार गोल केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 6 गोल केले. तर , दुसरीकडं पाकिस्तानच्या संघाला पहिल्या सत्रामध्ये खातंही उघडता आलं नाही, पण दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करण्यात यशस्वी ठरले. पण भारताच्या आक्रमक खेळापुढं पाकिस्ताननं अक्षरशः नांगी टाकली. या मोठ्या विजयानंतर भारतानं उपांत्यफेरीत आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे हॉकीतही भारताने आपले एक पदक निश्चित केले आहे.
कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी हा सलग चौथा विजय मिळवला आहे. यानंतर आता गट सामन्यात अर्थात पूल ए मध्ये भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. आजच्या सामन्यात कर्मधार हरमनप्रीतनं एकूण 4 गोल केले. याशिवाय वरुणनं 2 गोल, ललित, शमशेर, मनदीप आणि सुमीत यांनी प्रत्येकी 1 गोल केला.