| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेत आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार झाली. भारताच्या पुरूष आणि महिला रोलर स्केटिंग संघांनी 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. या दोन पदकांनंतर आता भारताची पदकसंख्या 57 झाली आहे. यात 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने कांस्यपदक जिंकून दमदार सुरूवात केली. संजना, कार्तिका, हीरल आणि अरथ्य या खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत 4:34.861 अशी वेळ नोंदवली. यानंतर लगेचच पुरूषांच्या 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत आर्यन पाल, आनंद कुमार, सिद्धार्थ राहुल कांबळे आणि विक्रम यांनी 4:10.128 अशी वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.