| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग या स्पर्धेत जय संतोष कवळे, नवेदर-नवगाव आणि रोहन अरुण गुरव, रामनाथ-अलिबाग या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून त्यांची 26 ते 29 गोवा येथे होणार्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंचा समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी जय आणि रोहन यांना आर्थिक मदत व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच कराटे प्रशिक्षक संतोष कवळे यांनीदेखील शुभेच्छा दिल्या.