जागतिक ऑलिम्पिक समितीचे शिक्कामोर्तब
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता ऑलिम्पिकमध्ये टी-ट्वेन्टी क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे. यावर जागतिक ऑलिम्पिक कमिटी सोमवारी मतदान करणार आहे. यानंतर अधिकृतरित्या क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. भारतासाठी हा महत्वाचा भाग ठरणार आहे. कारण सध्या सुरु असलेला आयसीसीचा क्रिकेट वर्ल्डकपचे भारताने आयोजन केले आहे. त्याचबरोबर मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नुकतेच 141व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सेशनचे आयोजन केले होते. तब्बल 40 वर्षानंतर भारतात हे पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेशनचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, 2036च्या ऑलिम्पिकचं यशस्वी आयोजन करण्यासाठी भारत कोणतीही कस सोडणार नाही.
चार खेळांचा होणार ऑलिम्पिकमध्ये समावेश जागतिक ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने गेल्या आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या ऑलिम्पिकसाठी ज्या खेळांचा समावेश करायचा आहे, त्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटच्या टी-ट्वेन्टी प्रकाराशिवाय इतर चार खेळाचा समावेश आहे. यामध्ये बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉझ (सिक्सेस) आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश आहे. यावर सोमवारी मतदान घेतले जाणार होते.
क्रिकेट टी-ट्वेन्टीची लोकप्रियता वाढतेय जागतिक ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, क्रिकेटसह इतर चार खेळांचा समावेश हा केवळ 2028 च्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. ही बाब अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि अमेरिकेतील तसेच जागतिक स्तरावरील नवीन खेळाडूंना आणि चाहत्यांना ऑलिम्पिक समुदायाशी संलग्न होण्यास मदत होईल. क्रिकेट टी-ट्वेन्टीची लोकप्रियता वाढत आहे. 50 षटकांच्या क्रिकेटने यापूर्वीच मोठे यश मिळवले आहे, असेही त्यांनी म्हटले होते.