| उरण | वार्ताहर |
चिटफंडच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सतीश गावंड याला दुसऱ्यांदा अटक करण्यात पोलिसांना अडीच महिन्यांनी यश आले. गुन्ह्यामध्ये अटक होताच त्याने दर आठवड्याला पोलिसांसमोर चौकशीला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयातून जामीन मिळवला होता. मात्र जामीन मिळताच त्याने पोबारा केला होता. यामुळे पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करून पुन्हा त्याच्या शोधासाठी कंबर कसली होती. परंतु अडीच महिन्यांपासून तो फरार होता. अखेर मध्य प्रदेशमधून गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याला अटक केली. यावेळी न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबर पर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे. यामध्ये चौकशीत त्याची इतरही अधिक संपत्ती पोलिसांसमोर आली आहे.