| पनवेल | वार्ताहर |
संपूर्ण जिल्ह्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये खालापूर येथील जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथील बांधव काही दिवस श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरात वास्तव्यास होते. त्या दरम्यान त्यांच्यासोबत जे एम म्हात्रे कुटुंबीयांचा एक जिव्हाळा निर्माण झाला आहे. दुर्घटनेनंतर जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीमध्ये एक दिवस श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधील देवीच्या आरतीचा मान तेथील या बांधवांना देण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले की, नवरात्रीमध्ये एक दिवस आमच्या देवीच्या आरतीचा मान आपल्या या बांधवांना द्यावा अशी संपूर्ण कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी पंचायतन सभागृहात पारंपारिक आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.