प्रितम म्हात्रेंनी घेतले देवीचे दर्शन
| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. नवी मुंबईला लागूनच उलवे शहरामध्ये यावर्षी नवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील सचिन येरुणकर यांच्या आम्ही उलवेकर मित्र मंडळ सेक्टर 17 मधील नवसाला पावणारी उलवेची कुलस्वामिनीचे आशीर्वाद घेऊन शेकाप नेते आणि पमपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उलवे येथे दर्शन घेतले. जगदंब कच्छ पटेल पाटीदार लेवा समाजाचे कांजीभाई पटेल दीपक पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
उलवेमध्ये बंगाली समाजाने स्थापन केलेल्या सेक्टर 9 उलवे नोड येथील बंगाली वेल्फेअर ट्रस्टच्या नवरात्र उत्सवामध्ये सर्व परिसरातील दांडिया रसिक शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून रास दांडिया खेळतात. त्या ठिकाणी जाऊन म्हात्रे यांनी देवीचे दर्शन घेतले. उलवे येथील श्री राम मित्र मंडळ (सेक्टर 5), शिवसंघर्ष प्रतिष्ठान (से.20) , जय अंबे मित्र मंडळ (सेक्टर 18) व अन्य ठिकाणी भेट देऊन बक्षीस समारंभाला उपस्थित राहून गरबा रसिकांना नवरात्र उत्सवाच्या म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.