| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दीपावलीचे औचित्य साधून दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील नयन कर्णिक यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, उपाध्यक्षा उषा खोत, सचिव नैनिता कर्णिक, कार्याध्यक्ष अरूण बागडे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक डॉ. रवींद्र नामजोशी, नयन कर्णिक, वैशाली कासार मान्यवरांनी दीपप्रज्वलन व श्री सरस्वतीपूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्व उपस्थितांना चाफ्याची फुले देऊन स्वागत करण्यात आले. अरुण बागडे यांनी ओमकार स्वरूपा गीत म्हणून देवाची प्रार्थना केली, तर ज्येेष्ठ डॉ. रवींद्र नामजोशी यांनी गायनाबरोबर मतितार्थही सांगितला.
मुरुड नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांनी मेघालय या भागातील आठवणी सादर केल्या, तसेच संजय गुंजाळ, गणेश पुगावकर, नयन भगत, सुनील मोहिले, आशिष पाटील, आशुतोष कर्णिक, योगेश दवटे, वीरेंद्र भोईनकर, ओम जोशी, वासंती उमरोटकर, उषा खोत, वैशाली कासार, रिद्धी भगत, साधना सबनीस यांनी दीपावलीवर आधारित कविता, काही गमतीदार किस्से, गझल, स्वरचित कविता सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. नैनिता कर्णिक यांनी सर्वांना झाडांची रोपे देऊन झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला. सूत्रसंचालन उर्मिला नामजोशी यांनी केले. आशिष पाटील, योगेश दवटे, सिद्धेश लखमदे अमोल रणदिवे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, तर नैनिता कर्णिक यांनी आभार मानले.