| तळा |वार्ताहर |
विकसीत भारत संकल्प यात्रा रथाचे तळा तहसिल येथे तहसिलदार स्वाती पाटील आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी स्वागत केले. भारत सरकारच्या फ्लँगशिप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसीत भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विकसीत भारत संकल्प यात्रा योजनांच्या रथाचे शुक्रवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तळा तहसिल आवारात तहसिलदार स्वाती पाटील गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांनी स्वागत केले. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी, पंचायच समिती कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकल्प यात्रारथ तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या परिसरात फिरणार आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद साधने, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे अशी विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.