| पनवेल | वार्ताहर |
आजची लहान मुले भविष्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावीत यासाठी प्रथमेश भास्कर पुंडे यांनी मुलांना पोषण आहार मिळण्याची मागणी केली आहे. करंजाडेतील प्रत्येक लहान बालकांना व गर्भवती महिलांना पोषण आहार देण्याबाबत व नवीन अंगणवाड्या सुरू करण्याबाबत पुंडे यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
करंजाडे वसाहतीत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याने लहान बालकांना महिला बाल कल्याण विभागामार्फत देण्यात येणारा पोषण आहार मिळावा यासाठी प्रथमेश पुंडे प्रयत्न करत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले असता अनेक लहान बालकांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात आली ज्यामुळे या मागणीची पूर्तता लवकरच करण्यात येईल. तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्यांची पूर्तता करण्यासाठी प्रथमेश पुंडे यांचा पाठपुरवठा सुरू आहे. लवकरच करांजाडेतील बालकांना पोषण आहार सुरू होईल, नवीन अंगणवाड्या सुरू करण्याच्या मागणी पाठपुराव्याला नक्की यश येईल यात काहीच शंका नाही, अशी माहिती प्रथमेश भास्कर पुंडे यांनी दिली आहे.