| खांब | वार्ताहर |
राष्ट्रीय व सामाजिक हितासाठी कार्य करणार्या आशुआदू फाऊण्डेशन वांगणी-ठाणे यांच्या वतीने रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रा.पंचायत हद्दीतील तळवलीतर्फे अष्टमी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्राम पंचायत हद्दीतील रुग्णाची नेत्र रूग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरजवंत रूग्णांना मोफत औषधोपचाराचे वाटप करण्यात आले. या संस्थेच्या वतीने हृदयविकार शस्त्रक्रिया,अॅन्जिओप्लास्टी, बायपास ह्दय शस्त्रक्रिया,कॅन्सरवरील शस्त्रक्रिया,पोटाचे विकार आणि शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू आदी शस्त्रक्रिया यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शिबीराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेतला.







