| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण परिसरातील सार्वजनिक विहीरीत बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.22) सायंकाळी घडली. विक्रांत विजय हुंडलीकर असे या तरुणाचे नाव आहे. हा मुंबईमधील चेंबूर येथील रहिवासी आहे.
विजय हुंडलीकर मित्रांसोबत वाघ्रणमध्ये आला होता. गुरुवारी दुपारी गावातील विहारीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र तो पाण्यात उडी मारल्यानंतर बराच वेळ तो वर आला नाही. त्यामुळे सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला.
दोन ते तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने अखेर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. परंतु तो बेशुध्द अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.