| उरण | वार्ताहर |
2022 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीची विजयाची वर्षपूर्ती व वचनपूर्ती सोहळा निमित्त 1984 च्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना अभिवादन करुन पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार 2 जानेवारी रोजी शिवस्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. पागोटे गावात रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बसविण्यात आलेल्या हुतात्म्याना सर्वप्रथम मानवंदना देण्यात आले. यावेळी माजी आ. मनोहर भोईर व माजी आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. हुतात्मा स्मारक नुतनीकरणाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शुद्ध पिण्याच्या पाणी (आर. ओ प्लान्ट) चे लोकार्पण माजी आ. भोईर, माजी आ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष ठाकूर, विकास नाईक, दिपक ठाकूर, महादेव बंडा, मु. ग. पाटील, मनोहर पाटील, रमेश पाटील, अनिल पाटील, महेश पाटील, दिपक भोईर, विनोद पाटील, सुमित पाटील महेंद्र पाटील, सुनिल तांडेल, दर्शना माळी, मनीषा ठाकूर, तृप्ती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील, सतिश पाटील, सुजित तांडेल, अधिराज पाटील, मयूर पाटील, प्राजक्ता पाटील, समृध्दी तांडेल, करिश्मा पाटील, सुनिता पाटील, सोनाली भोईर, प्रकाश भोईर, सुरेंद्र पाटील, शैलेंद्र पाटील, ऋषिकेश म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आतिश पाटील यांनी केले.







