महाराष्ट्राच्या रुद्रांक्षला रौप्य पदक
| जकार्ता | वृत्त्तसंस्था |
भारताच्या नॅन्सी हिने आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. याच प्रकारात ऑलिंपियन नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने रौप्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील याने ब्राँझपदकावर नाव कोरले. नॅन्सी हिने विक्रमी 252.8 गुणांची कमाई करताना सुवर्णपदक जिंकले. इलावेनिल हिचे सुवर्णपदक थोडक्यासाठी हुकले. तिने 252.7 गुणांची कमाई करीत रौप्यपदकावर हक्क सांगितला. रुद्रांक्ष पाटील याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात 228.7 गुणांसह ब्राँझपदक पटकावले.







