| खोपोली | प्रतिनिधी |
अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्यातून अक्षता कलश प्रत्येक भागात आले आहेत. त्यानिमित्ताने अक्षता कलश व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या औचित्य साधत शनिवारी (दि.14) संयुक्तरित्या पालखी सोहळ्याचे आयोजन लवजी ग्रामस्थ, वेध सह्याद्रीतर्फे करण्यात आले होते.
श्री हनुमान मंदिरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला, बालगोपाळ, तरुण व ज्येष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महिलांनी त्याचप्रमाणे तरुणांनी व ज्येष्ठांनी पारंपारिक मंगलवेश परिधान केला होता.
22 जानेवारी रोजी अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक भारतवासीयांनी हा दिन दिवाळी सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. तसेच घरोघरी पणत्या, आकाश कंदील, भगवा ध्वज लावावा असे आवाहन रां.स्व.संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विजय कापडी यांनी यावेळी बोलताना केला.







