| नेरळ | वार्ताहर | कर्जत तालुक्यातील क्रिकेटपट्टू यांनी काही वर्षांआधी फोर्टी प्लस क्रिकेट संघटना स्थापन केली आहे. दर आठवड्याला एकत्र येऊन क्रिकेट खेळाडूंनी या चाळीस वर्षे वयावरील क्रिकेटपटू यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सामाजिक संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना आजपर्यंत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.
कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचा मुळ उद्देश ‘एक धाव आरोग्यासाठी’ असा असून ‘पुन्हा एकदा तारुण्याकडे’ हे ब्रिद वाक्य आहे. कर्जतमधील फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नेहमीच समाजासाठी काहीतरी विशेष भरीव व प्रेरणादायी काम करण्याचा मानस त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात उतरविला आहे. त्यामुळे कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट संघटना हि समन्वयाच्या भुमिकेतून नेहमीच ज्येष्टांचे व सहकारी यांचे मार्गदर्शन घेत असतात. तर, त्यांनी नेहमीच शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम यशस्वी राबविले आहेत. निरोगी आयुष्य तसेच समाजोपयोगी विविध योजना व कल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी एकसंघपणे सक्षमपणे उभी असणारी फोर्टी प्लस क्रिकेट संघटना कर्जतकरांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.
मरणोत्तर अवयव दान संकल्पसाठी ऑर्गन डोनेट कप 2024 आयोजन कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. उपक्रमाच्या माध्यमातून फोर्टी प्लसचे दहा आणि फिफ्टी प्लसच्या दहा संघाचा सहभाग होता. यावेळी कर्जत फोर्टी प्लस संघटनेने पुढाकार घेवून आयोजित केलेल्या स्पर्धेतील बहुतेक सदस्य अवयव दान करण्यासाठी फॉर्म भरले.