| उरण | वार्ताहर |
महिलांचे संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू चिरनेर गावातील श्रीविष्णू लक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ महिलांचे औक्षण तसेच श्रीगणेशाची आरती करून केली. मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात घरातून हळदी कुंकू समारंभ केला जातो. त्याचा एक भाग म्हणून श्री विष्णू लक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बेबीताई म्हात्रे, उज्वला म्हात्रे, वंदना नारंगीकर, सोनाली म्हात्रे, भारती म्हात्रे, प्रतिभा म्हात्रे, देवकाताई म्हात्रे, सुमन नारंगीकर, सुप्रिया म्हात्रे, वैजयंती ठाकूर, शांताबाई नारंगीकर, सविता ठाकूर, मंदा नारंगीकर, बेबीताई फोफेरकर, सुमन भगत, कुंदा म्हात्रेसह मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.