I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
रायगड जिल्ह्यात सोमवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या 84 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 183 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज पनवेल शहरात 41, पनवेल ग्रामीणमध्ये 8, अलिबागमध्ये 21, पेणमध्ये 1, कर्जतमध्ये 4, सुधागडात 2, म्हसळा 1, उरण 1, खालापूरात 3, श्रीवर्धन 1, पोलदपूर 1 अशी रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाड, माणगाव, तळा, रोहा, मुरुड या 5 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 623 झाली आहे. यापैकी 1 लाख 60 हजार 013 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 224 वर गेला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 386 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.