| रसायनी | वार्ताहर |
खालापूर युवा वकील संघटना व युवा वकील क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय कार्यालयांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते, यात गटविकास अधिकारी खालापूर यांच्या अ व ब संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून अ संघाने प्रजासत्ताक चषक पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खालापूर न्यायालय संघ, खालापूर युवा वकील अ, खालापूर वकील ब, पंचायत समिती अ व ब, खालापूर तहसील संघ, डॉक्टर संघ आणि स्थानिक गावदेवी संघ यांच्यात चुरशीच्या लढतीत गटविकास अधिकारी अ व ब या दोन्ही संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून अ संघाने प्रजासत्ताक चषक जिंकला. या खेळाचे विषेश म्हणजे खालापूर दिवाणी न्यायाधीश आर. ए. वाकळे, दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड हे मैदानात उतरले, आणि फलंदाजी, गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण केले.
तलाठी, ग्रामसेवक, शासकिय कर्मचारी यांनी खेळाचा आनंद लुटला. यावेळी विधीतज्ञ सर्वश्री सचिन पाटील,अजिद गायकवाड, संदेश धावारे, राजेंद्र येरूनकर, अभिजित बलकवडे, नितिन तोरणे यांनी उपस्थित राहून संघाना प्रोत्साहन दिले. सदर क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी विधीतज्ञ सर्वश्री सोमनाथ दळवी, उमेश पवार, योगेश मानकवले, जितेंद्र जाधव, जयेश तावडे, मनोज पाटील, तुषार बोम्बे, भगवान लाले, मिलिंद गायकवाड, रितेश पाटील,महेश भद्रिके, मिलिंद सुरावकर,मयूर कांबळे, गजानन पवार,राजू मोरे, अभिजित बलकवडे, संजय टेंबे, रमेश पाटील, गणेश दळवी, करण कडव यांनी विशेष परिश्रम घेतले. सामनावीर विकी आम्रे ठरला.