| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्वी,अलिबाग येथे शुक्रवारी भूगोल विभागाअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना क्षेत्रीय मापन पद्धत याबाबत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बी. के. पाटील (निवृत्त भूमापन अधिकारी अलिबाग, रायगड) यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. भविष्यात या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबद्दल त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील, इतिहास विभाग मिलिंद घाडगे, इंग्रजी विभाग प्रमुख अशुतोष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भूगोल विभागाच्या प्रा. संजना पाटील यांनी केले