। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी 165 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 85 रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदिर सभागृहात हे शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. रोहा सिटिझन फोरम सातत्याने अंधत्वाकडून दृष्टीकड हे अभियान राबवत आहे. रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केली जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे. रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणार्या सर्वांचे आभार मानले.