| सिडनी | वृत्तसंस्था |
शेरफेन रुदरफोर्ड – आंद्रे रस्सेल या जोडीच्या झंझावाती व विक्रमी फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाने येथे झालेल्या अखेरच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन संघावर 37 धावांनी विजय मिळवला. रुदरफोर्डने नाबाद 67 धावांची आणि रस्सेलने 71 धावांची स्फोटकी खेळी साकारली. दोघांनी 139 धावांची विक्रमी भागीदारीही रचली. ही लढत वेस्ट इंडीजने जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेत 2-1 अशी बाजी मारली.







