| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तर निधीतून बांधण्यात आलेल्या गणेशनगरातील विहीरीचा लोकार्पण सोहळा सरपंच सेजल घुमकर, मेघा मापगावकर व विहिर बांधण्यासाठी जमीन देणाऱ्या नथुराम नांदगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
याकरिता दि.15 जून 2011 रोजी यशवंत नांदगावकर यांच्या स्मरणार्थ पत्नी इंदिरा नांदगावकर, भारती नांदगावकर, सविता नांदगावकर यांनी गणेश नगर येथील स्वमालकीची जागा विनामूल्य नांदगाव ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिली होती. सदर जागेवर ग्रामपंचायतीने विहीर खोदून दिली. या विहिरीतील पाण्यासाठी लवकरच एक साठवण टाकी बांधून जलवाहिनी व्दारे त्यात पाण्याचा साठा करून ते पाणी ग्रामस्थांना पुरविण्यात येणार असल्याचे सेजल घुमकर यांनी सांगितले. विहीरीमुळे या परिसरातील ग्रामस्थांना कठीण परिस्थितीत पाणी पुरवठा होईल असे येथील ग्रामस्थ हरिभाऊ शेळके यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अस्लम हलडे, ग्रामसेवक प्रमोद म्हात्रे, मंजुम घोले, उदय थळे, नितेश रावजी, महेंद्र चौलकर नरेश कुबल, महेश मापगावकर, सुदेश घुमकर, अलिमबाबा मुल्ला, सचिन पाटील, भक्ती चोरघे, गणेश नगरातील महिला वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.