| नगर | प्रतिनिधी ।
पारनेर शहरात गुरुवारी सकाळी नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच फसल्याने पठारे बचावले. पठारे यांच्यासमवेत असलेल्या एकाने गोळीबार करणाऱ्याच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा प्रयत्न करणारा अल्पवयीन असून, तो पारनेर तालुक्यातीलच रहिवासी आहे. नगरसेवक पठारे यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला, याची चौकशी पोलीस करत आहेत. संबंधीत अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यासमोर पठारे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.