। अलिबाग । प्रतिनिधी ।
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधित समुपदेशन करण्यासाटी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारीपासून सुरु केली असल्याची माहिती डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि.19 मार्च 2024 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दि.01 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहेत.
या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणार्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच, मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक, शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.15 फेब्रुवारी 2024 पासून कार्यान्वित करण्यात आली असून या नियंत्रणकक्षाचे कामकाज सकाळी 9.00 ते रात्री 7.00 या वेळेत सुरु राहणार आहे.
मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधीक्षक तथा प्रधान सहसचिव, शुभांगी भोसले, 9833369330, वरिष्ठ अधीक्षक तथा सहाय्यक सचिव छाया मेढेकर, 9869489606, वरिष्ठ अधीक्षक दिलीप नांदगावकर, 8779062029, वरिष्ठ अधीक्षक नयन म्हात्रे, 9819806109 आदींचा समावेश करण्यात आला आहे.