। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.श्रीनिवास जोशी, किशोर लहारे, पंकज गमे, डॉ.चव्हाण, डॉ.व्हनकट्टे आदि उपस्थित होते. यावेळी पंकज गमे यांनी प्रास्ताविकात विज्ञान दिनाचे महत्त्व विषद केले व विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान या संकल्पनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. किशोर लहारे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनात कशा प्रकारे
अंगीकारला पाहिजे याबद्दल माहिती दिली.