| म्हसळा | वार्ताहर |
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने म्हसळातर्फे ‘स्वच्छ भारत अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या अभियातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसळा सार्वजनिक वाचनालय, म्हसळा ग्रामीण रुग्णालय आणि म्हसळा एस.टी. स्थानक परिसरात चार तास स्वच्छता करण्यात आली. या मोहीमेच्या अंतर्गत परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्त पर्यावरण, सांडपाणी व्यवस्थापन, ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण व त्याचे विल्हेवाट यावर पथनाट्य सदर करण्यात आले. या मोहिमेत रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण आणि प्रा. डॉ. जगदीश शिगवण यांच्या समवेत 84 विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी म्हसळा सार्वजनिक वाचनालायचे अध्यक्ष संजय खांबेटे आणि सदस्य उमरोटकर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वयंसेवकांना वाचनालयाच्यावतीने अल्पोपहाराची व्यवस्था केली.