| पोलादपूर | प्रतिनिधी |
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये महाडच्या स्व. माणिक जगताप समर्थक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांना पदाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, पोलादपूर तालुक्यातील जगताप गटाच्या एक डझन शिवसैनिकांना नुकतीच पदाधिकार नियुक्ती जाहीर झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील ज्या शिवसैनिकांनी बंडखोरांसोबत जाणे टाळले अशा महिला व पुरूष शिवसैनिकांना सर्वात आधी पदाधिकारी नियुक्ती जाहीर झाली. यानंतर काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी होण्याची प्रतीक्षा दिसून आली. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जगताप यांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते हनुमंत जगताप, बाळ राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल 12 कार्यकर्त्यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारीपदी नियुक्तीची पत्र प्रदान करण्यात आली.